लीजा हेडनने दिला गोंडस मुलाला जन्म!

लीजा हेडन हिच्या फॅन्ससाठी एक गोड बातमी आहे. लीजा पहिल्यांदा आई बनली असून, तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. तिने तिच्या चिमुकल्याचे नाव जॅक ललवानी असे ठेवले असून, मुलासह एक फोटो इन्स्टाग्रामवरही शेअर केला आहे. यावेळी तिने फोटो ओळींमध्ये लिहिले की, जॅक ललवानीचा जन्म 17 मे 2017 रोजी झाला. फोटोमध्ये लीजा पती डीनो ललवानी आणि आपल्या चिमुकल्यासोबत दिसत आहे. सध्या तिच्यावर सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. प्रेग्नेंसीदरम्यान लीजा सोशल साइटवर खूपच ऍक्‍टिव्ह होती. ती सातत्याने इन्स्टाग्रामवर बेबी बंप दाखविणारे फोटोज्‌ शेअर करताना बघावयास मिळत होती. जर तुम्हाला आठवत असेल तर, लीजाने या वर्षाच्या सुरुवातीलाच एक बेबी बंम दाखविणारा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करून प्रेग्नेंसीची माहिती दिली होती. ज्यामुळे तिच्या फॅन्समध्ये एकच उत्साह निर्माण झाला होता. शिवाय मीडियामध्येदेखील लीजाच्या प्रेग्नेंसीच्या बातम्या पसरल्या होत्या. त्यानंतर मात्र काही दिवसांच्या टप्प्यानंतर सातत्याने लीजा फोटो शेअर करीत होती. त्यामुळे लीजा गोड बातमी केव्हा देणार याविषयी तिच्या चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. आता लीजाने ही बातमी दिल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान, लीजा आणि तिचा बॉयफ्रेण्ड डीनो ललवानी गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर हे दोघे गेल्यावर्षी ऑक्‍टोबर महिन्यात विवाहबद्ध झाले होते. लीजाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. आतापर्यंत लीजा कित्येक लाइफस्टाल साप्ताहिकाच्या कव्हर पेजवर झळकली आहे. लीजा नुकतेच ये दिल हैं मुश्‍किल या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारताना बघावयास मिळाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)