लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या बिल्डरकडून जोडीदाराचा खून

पिंपरी – लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या जोडीदाराचा चारित्र्याच्या संशयातून एका बांधकाम व्यावसायिकाने डोक्यात फावडा घालून खून केला. ही घटना मोशीतील, नागेश्वर कॉलनी येथे शुक्रवारी (दि. 30) रात्री साडेआठच्या सुमारास घडली.

शारदाबाई महेशभाई पटेल (वय 50, रा. नागेश्वर कॉलनी, मोशी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक तिचा महेशभाई रामजी पटेल (वय 55) याच्याविरोधात भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोघेही लिव्ह इन रिलेशनशीप मध्ये राहत होते.

एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे यांनी याबाबत माहिती दिली. पटेल मूळचे भोपाळचे रहिवासी आहेत. शारदाबाई या गेल्या 15 वर्षांपासून महेश यांच्यासोबत मोशी परिसरात राहत होत्या. त्यांचे हे दुसरे लग्न होते. त्यांच्या पहिला पतीचा दोन वर्षापूर्वी मृत्यू झाला आहे. महेश हा शारदाबाईच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेत होता. त्यामुळे त्यांच्यात नेहमी भांडणे होत होती.

शुक्रवारी रात्री महेश मद्यप्राशन करुन घरी आला. त्यानंतर या दोघांमध्ये भांडणे सुरु झाली. महेश याने शारदाबाईच्या डोक्यात फावडा घालून निर्घृण खून केला आणि पसार झाला. सकाळी पटेल कुटुंबीयांच्या घराचा दरवाजा उशिरापर्यंत बंद होता. त्यामुळे शेजाऱ्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा उघडला असता शारदाबाई मृत अवस्थेत आढळून आल्या. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)