‘लिव्ह-इनमधील युगुलामधील सहमतीचे शारीरिक संबंध बलात्कार नव्हे’

सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा

नवी दिल्ली -लिव्ह-इन रिलेशिनशिपमध्ये असणाऱ्या युगूलामधील पुरूषाला त्याच्या नियंत्रणापलिकडे असणाऱ्या परिस्थितीमुळे महिलेशी विवाह करण्यात अपयश आल्यास त्यांच्यातील सहमतीचे शारीरिक संबंध बलात्कार ठरत नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिला. महाराष्ट्रातील एका नर्सने एका डॉक्‍टरविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द करताना न्यायालयाने वरील निर्वाळा दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

संबंधित नर्स आणि डॉक्‍टर काही काळ लिव्ह-इन रिलेशिनशिपमध्ये होते. नर्सने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची विनंती करणारी डॉक्‍टरची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्या निर्णयाविरोधात डॉक्‍टरने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने संबंधित डॉक्‍टरला दिलासा देताना वरील निर्वाळा दिला. बलात्कार आणि सहमतीचे शारीरिक संबंध यांमध्ये स्पष्ट फरक असल्याचे न्यायालयाने म्हटले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)