‘लिव्ह इन’च्या आमिषाने गंडा

पिंपरी – आपण “लिव्ह अँड रिलेशनशिपन’मध्ये राहू, असे सांगून एका अनोळखी महिलेने व्हाटसऍपद्वारे तरुणाचा विश्‍वास संपादन केला. तसेच वडिलांना कर्करोग झाल्याचे सांगत उपचारासाठी ऑनलाईन पद्धतीने 53 लाख 65 हजार रुपये उकळत फसवणूक केल्याचा प्रकार निगडीतील यमुनानगरमध्ये उघडकीस आला आहे.

जहीर युसूफ शिकलगार (वय-30, रा. सेक्‍टर नंबर 21, यमुनानगर, निगडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार मोबाईल धारक अनोळखी महिला व अनोळखी पुरुषावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर 2017 मध्ये एका अनोळखी महिलेने जहीर यांना व्हाट्‌सऍप वरून मेसेज केला. त्यांचा विश्‍वास संपादन करत आपण दोघे “लिव्ह अँड रिलेशनशिप’मध्ये राहू, असे सांगितले. काही दिवसांनी अज्ञात आरोपी महिलेने तिच्या वडिलांना कर्करोग असल्याचे सांगितले. उपचारासाठी पैशांची गरज असल्याचे सांगत वारंवार आर्थिक मदत मागितली.

घेतलेले पैसे ठरलेल्या वेळेत परत करीन असे महिलेकडून सांगण्यात आले. त्यामुळे जहीर यांनी वेळोवेळी पेटीएम, फोन पे, मोबिक्विक, एसबीआय व्हॅलेट एचडीएफसी बॅंकेतून एनईएफटी आणि आयएमपीएस द्वारे महिलेला 53 लाख 65 हजार रुपये पाठविले. परंतु दिलेल्या वेळेत महिलेने पैसे परत केले नाहीत. तसेच काही दिवसानंतर तिच्याशी संपर्कही झाला नाही, यावरून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जहीर यांनी निगडी पोलिसांत धाव घेतली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)