“लिव्ह इन’च्या आमिषाने गंडविणाऱ्या “बंटी-बबली’ला बेड्या

पिंपरी – लिव्ह इन रिलेशनशिपचे आमिष दाखवून एका इसमाला 53 लाख 65 हजारांचा गंडा घालणाऱ्या दाम्पत्याला हैद्राबाद येथून जेरबंद करण्यात निगडी पोलिसांना यश आले.

जहीर युसूफ शिकलगार (वय-30, रा. सेक्‍टर नंबर 21, यमुनानगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत हैद्राबाद येथून प्रवलिका राजेश गौड (वय-24) व राजेश प्रभाकर गौड (वय-28, रा. तेलंगणा) या “बंटी-बबली’ दाम्पत्याला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिकलगर व प्रवलिकाची वर्षभरापूर्वी व्हॉटसऍपद्वारे ओळख झाली होती. ती त्यांच्याशी केवळ व्हॉटस्‌ऍपद्वारेच संपर्क साधत होती. त्यांची कधीही भेट झाली नसताना तिने शय्या सोबत व “लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहण्याचे आमिष दाखवत त्यांचा विश्‍वास संपादन केला. व्हॉटस्‌ऍपद्वारे वेळीवेळी संभाषण करुन माझे वडील हे कर्करोगग्रस्त असल्याचे सांगत ऑनलाईन पद्धतीने सप्टेंबर 2017 ते 6 ऑगस्ट 2018 या कालावधीत तब्बल 53 लाख 65 हजार रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी निगडी पोलिसांत धाव घेतली.

निगडी पोलिसांनी मोबाईल क्रमांक व बॅंक खाते याच्याद्वारे तपासाची चक्रे फिरवली. त्यानुसार, हैद्राबाद येथे जात संशयीत महिलेला ताब्यात घेतले. यावेळी तिने या पैशातून कार, घर, दागिने, महागड्या वस्तू, महागडे मोबाईल खरेदी केल्याचे कबूल केले. यामध्ये पतीने साथ दिल्याचेही तिने कबूल केले. त्यानुसार, त्यालाही अटक करण्यात आली. त्यांच्याकडून पोलिसांनी 10 लाख 3 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

निगडी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र जाधव, निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली किसन वडेकर, मच्छिंद्र घनवट,आनंद चव्हाण, राम साबळे, विश्‍वास नाणेकर, चेतन सावंत, सुनील शिंदे यांनी ही कामगिरी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)