लिव्हरपूलने उडवला अर्सेनालचा धुव्वा

लिव्हरपूल: रॉबर्टो फरमिंगोच्या बहरदार खेळाच्या जोरावर इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये लिव्हरपूलने अर्सेनालचा 5-1 असा धुव्वा उडवला. स्टार खेळाडू मेसित ओझील संघात नसल्याने अर्सेनालला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. अर्सेनालसाठी नईलसने एकमात्र गोल केला.

तर लिव्हरपूलसाठी फेरमिंगो ने हॅटट्रिक नोंदवली आणि सदिओ माने आणि मोहंमद सलाहने प्रत्येकी एक गोल केले. या विजयासह लिव्हरपूल गुणतक्त्‌यातील आघाडी आणखी मजबूत केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सत्राच्या सुरुवातीला 11व्या मिनिटाला आर्सेनल संघाच्या नाईलसने गोल करत आघाडी मिळवली. परंतु फरमिंगोने काही मिनिटात दोन गोल करत लिव्हरपूलला 2-1 असे पुढे नेले. त्यानंतर मानेने 32 व्या आणि सलाहने 45+2मिनिटाला गोल करत आघाडी 4-1 केली.

दुसऱ्या सत्रता एकमात्र गोल फर्मींगोने केला आणि लिव्हरपूल सामना 5-1 असा जिंकला. या विजयासह ते प्रीमियर लीगमध्ये 20 सामन्यात अपराजित राहिले असून ते 54 गुणांसह पहिल्या स्थानी विराजमान आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)