लिफ्ट हवी सुरक्षित (भाग-१)

बहुमजली इमारती ही काळाची गरज असून, अशा इमारतींमध्ये लिफ्ट ही आता प्राथमिक गरज बनली आहे. लिफ्टचा वापर करताना सुरक्षिततेच्या काही गोष्टी समजून घेणे आवश्‍यक असून, वरचेवर देखभाल-दुरुस्ती करण्याबरोबरच लिफ्टमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने जी नवनवीन उपकरणे आली आहेत त्यांचीही माहिती करून घेणे गरजेचे आहे. सेन्सर, अंतर्गत ऊर्जास्रोत, इंटरकॉम आदी उपकरणे लिफ्टमध्ये आहेत का, याची माहिती करून घेतली पाहिजे.

बहुमजली इमारती ही देशातील बहुतांश मोठ्या शहरांची आता ओळख बनली आहे. जमीन कमी आणि लोकसंख्या जास्त अशी परिस्थिती असल्यामुळे जास्तीत जास्त उत्तुंग इमारती शहरांमध्ये बांधल्या जाऊ लागल्या. सध्या शहरांमध्ये बहुतांश गृहनिर्माण योजना बहुमजलीच असतात. अर्थातच अशा इमारतींमध्ये लिफ्ट असणे ही प्राथमिक गरज बनली आहे. कायद्यानुसार आणि बांधकाम नियमावलीनुसार इमारतींमध्ये लिफ्ट असणे अनिवार्य करण्यात आले आहे. नॅशनल बिल्डिंग कोड अन्वये 13 मीटरपेक्षा अधिक उंची असलेल्या कोणत्याही इमारतीत 6 व्यक्तींच्या क्षमतेची लिफ्ट असणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ज्या इमारतीत अधिक कुटुंबे राहतात, त्या इमारतीत कुटुंबांच्या संख्येनुसार लिफ्टची संख्याही ठरवून देण्यात आली आहे. ज्या अपार्टमेंटमध्ये 40 कुटुंबे राहतात, त्या इमारतीत कमीत कमी एक लिफ्ट असणे नियमानुसार गरजेचे आहे.

रहिवाशांच्या संख्येच्या तुलनेत लिफ्टची संख्या कमी असण्यामुळे दुर्घटनांचा धोका वाढतो. विशेषतः बराच वेळ लिफ्टची वाट पाहिल्यानंतर जेव्हा लिफ्ट येते, तेव्हा त्यात प्रवेश करण्याची गडबड सर्वांनाच असते आणि हेच दुर्घटनेचे कारण ठरते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लिफ्ट हवी सुरक्षित (भाग-२)

लिफ्टच्या सुरक्षिततेसाठी मोशन सेन्सर किंवा डोअर सेन्सर ही अत्यावश्‍यक बाब बनली आहे. लिफ्टमध्ये प्रवेश करण्याची गडबड प्रत्येकाला असते आणि या धावपळीत लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना विशेषतः अधिक धोका असतो. या गडबडीमुळे होणाऱ्या दुर्घटनांपासून बचावासाठी लिफ्टमध्ये मोशन सेन्सर असणे गरजेचे असते. या सेन्सरमुळे कुणी लिफ्टमध्ये प्रवेश करीत असताना किंवा बाहेर पडत असताना अचानक दरवाजा बंद होण्याचा धोका टळतो. लिफ्टच्या दरवाजांमध्ये कडेला पातळ पडदे लावलेले असतात आणि त्यामुळे लिफ्टमधून जाणाऱ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाते.

– जगदीश काळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)