लिफ्ट मागणाऱ्या नौदलातील अधिकाऱ्याला लुटले

पिंपरी – लिफ्ट मागत असताना दोन दुचाकीवरुन आलेल्या चौघा चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून नौदलातील अधिकाऱ्याकडून एक टॅबलेट फोन आणि रोख रक्कम असा एकूण 30 हजार 700 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. ही घटना बुधवारी (दि.24) दुपारी सव्वा दोनच्या सुमारास वाकड येथील मुंबई-बेंगलोर हायवे वरील हॉटेल ताजसमोर घडली.

विनायक शंकर पागावार (वय-44, रा. 673/1, चुनाभट्टी कॉलनी, एनएडी करंजा, ता. उरण, जि. रायगड) असे लुटमार झालेल्या भारतीय नौदलातील अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चौघा चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथील मुंबई-बेंगलोर हायवेवरील हॉटेल ताजसमोर विनायक हे लिफ्ट मागत उभे होते. यादरम्यान दोन दुचाकींवरुन आलेल्या चौघा चौरट्यांनी चाकूचा धाक दाखवून विनायक यांच्या जवळील एक टॅबलेट फोन व रोख रक्कम असा एकूण 30 हजार 700 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. आरोपी हे 18 ते 20 वयोगटातील असून त्यांनी तोंडाला रुमाल बांधले होते. हिंजवडी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)