लिंबखिंड ते मोळाचा ओढा रस्त्यावरील खड्ड्यांना पुन्हा मलमपट्टी

सातारा – लिंबखिंड ते मोळाचा ओढा या महामार्गाला सातारा शहराला जोडणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. याप्रकरणी वृत्तपत्रांमधूनही वारंवार बातम्या प्रसिद्ध होत असतात. मात्र, संबंधित विभागाकडून त्यावर ठोस उपाययोजना होताना दिसत नाही. प्रत्येकवेळी केवळ मुरुम आणि खडी टाकून थोडासा डांबराचा लेप लावून हे खड्डे मुजविले जात आहेत. दोन दिवसांपूर्वीदेखील हे खड्डे भरण्यात आले आहेत. परंतु, पुन्हा या रस्त्यावरील खड्डे “जैसे थे’ आहेत.

सातारा शहराला जोडणाऱ्या या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तसेस या मार्गावर तीन मोठी महाविद्यालये आहेत. याठिकाणी शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही प्रचंड आहे. या मार्गावर खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अनेक अपघात घडले आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने एकादाच या रस्त्याची दर्जेदार दुरुस्ती करावी, जेणेकरुन वारंवार खड्डे भरण्याची वेळ येणार नाही, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)