लिंपणगावची मासिक सभा कोरमअभावी रद्द

श्रीगोंदा: तालुक्‍यातील लिंपणगाव ग्रामपंचायतीच्या सदस्यांची मासिक सभा रविवारी (दि.6) कोरमअभावी रद्द करण्यात आली. सरपंचावर नाराजी असल्याने सदस्य अनुपस्थित राहिल्याचे समजले. गुरुवारी (दि.10) पुन्हा मासिक सभेचे आयोजन करण्यात आल्याचे समजते.

तालुक्‍यातील लिंपणगाव ग्रामपंचायतीमध्ये दोनवेळा अविश्‍वास ठराव आणून सरपंच बदलण्यात आले आहेत. सध्या माधुरी साळवे ह्या सरपंच आहेत. मात्र सरपंच साळवे या मनमानी कारभार करीत असल्याची काही सत्ताधारी सदस्यांसह विरोधी सदस्यांची ओरड आहे. त्यातच सरपंच साळवे यांनी रविवारी मासिक सभा ठेवल्याने सदस्य आणखी नाराज झाल्याचे समजते. सध्या लिंपणगाव ग्रामपंचायतीला सोळा सदस्य आहेत. आजच्या मासिक सभेला सत्ताधारी आणि विरोधी गटाचे मिळून दहा सदस्य अनुपस्थित होते. मासिक सभेचा कोरम पूर्ण होत नसल्याने लिंपणगाव ग्रामपंचायतीची मासिक सभा रद्द करण्यात आली. येत्या गुरुवारी (दि.10) पुन्हा मासिक सभेचे आयोजन करण्यात आल्याचे समजते.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सरपंच माधुरी साळवे हा कोणताही निर्णय घेताना सहकारी सदस्यांचा विचारात घेत नाहीत. सहकारी सदस्यांची अडवणूक करण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळे सत्ताधारी गटासह विरोधी गटाचे सदस्य सरपंच साळवे यांच्या मनमानी कारभारावर नाराज आहेत. मनमानी कारभार आणि त्यातच मासिक सभा रविवारी ठेवल्याने आम्ही सहकारी सदस्यांनी मासिक सभेला अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला.
– रेणुका धस, माजी सरपंच, लिंपणगाव


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)