लिंगबदल करून विवाहबद्ध झालेल्या जोडप्यास हत्येच्या धमक्‍या

मुंबई-प्रेमी जोडप्यास धमक्‍या देणारे केवळ चित्रपटातच असतात असे नाही. प्रत्यक्ष जीवनातही तशा घटना घडतात. केरळच्या लिंगपरिवर्तन केलेल्या जोडप्याला तसा अनुभव आला आहे. जन्मापासून बिंदू नावाची मुलगी आणि लिंगपरिवर्तनानंतरच्या आरव अप्पुकुट्टनने जन्मापासून चंदू असलेल्या पण लिंगपरिवर्तनानंतरच्या सुकन्या कृष्णनबरोबर प्रेमविवाह केला.

मुंबईतील कोकिळाबेन अंबानी हॉस्पिटलमध्ये लिंगपरिवर्तनाची प्रक्रिया चालू असण्याच्या काळातच त्यांची ओळख झाली, प्रेम जमले आणि नंतर ते विवाहबद्धही झाले. ते आता सुखाने संसार करत आहेत.

त्यांची ही आगळीवेगळी प्रेमकथा सोधल मीडियावर व्हायरल झाली. कौतुक झाले, पण त्याचबरोबर त्यांना अज्ञात व्यक्तींकडून ऑनलाईन धमक्‍याही येऊ लागल्या-हत्येच्या धमक्‍या !

आजपर्यंत त्यांना अशा प्रकारच्या धमक्‍या सात वेळा आलेल्या आहेत. आता त्यांनी त्याबाबत बेंगळुरूमधील पॅलेस रोड पोलीस चौकीत तक्रार नोंदवली असून त्याबाबत तपास चालू असल्याचे पोलीसांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)