लिंकरोडमुळे सुटली वाहतूक कोंडी

बोपखेल – गेली बरेच दिवस रोज वाहतूक कोंडीची समस्या सहन करत असलेल्या नागरिकांना लिंकरोडमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. गणेशनगर मधील रहिवाश्‍यांच्या दृष्टीने लिंकरोड अत्यंत महत्त्वाचा होता.

या परिसरात झपाट्याने वाढलेले नागरीकरण आणि त्यामुळे वाहनांची वाढती संख्या वाहतूक कोंडीचे मुख्य कारण मानली जात होती. मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी अलीकडेच कॉलनी नं 18 ते 7 या रस्त्यांना जोडणारा लिंकरोड तयार करण्यात आला आहे. या लिंकरोड मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका झाली आहे. तसेच लिंकरोडमुळे आता स्थानिक ज्येष्ठ नागरिकांना देखील निवांत फिरण्यासाठी जागा मिळाली असल्याचे स्थानिक नागरीक सांगत आहेत.

-Ads-

या प्रभागाच्या नगरसेविका हिराबाई घुले व शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले यांच्या पुढाकाराने लिंकरोड तयार करण्यात आला आहे. घुले यांनी सांगितले की, या भागातील नागरिकांच्या समस्या कमी करुन त्यांना आवश्‍यक त्या सर्व सुविधा पुरविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करु.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)