लासलगाव कांदा “लिलाव बंद’ चा मोशी, पिंपरीवर परिणाम नाही

पिंपरी – पिंपरी, दिवाळी व साप्ताहिक सुट्टयांमुळे राज्यातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेली लासलगाव बाजारपेठ येत्या 12 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहे. या नऊ दिवसांत कांद्याचे लिालव बंद राहणार आहेत. मात्र शहरातील मोशी व पिंपरीतील बाजारपेठांमध्ये बहुतांशी पुणे जिल्ह्यातूनच कांद्याची आवक होत असल्याने या ” कांदा लिलाव बंद’ चा फारसा परिणाम जाणवणार नाही.

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव ही मुख्य बाजारसमित्या रविवारपासून तर काही बाजार समित्या सोमवारपासून बंद राहणार आहेत. दिवाळी आणि साप्ताहिक सुट्ट्यांमुळे नाशिकमधील लासलगावसह इतर बाजार समित्या 11 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. त्यामुळे कांदा आणि धान्याचे लिलाव तब्बल आठवडाभर बंद राहतील. 12 नोव्हेंबरला पुन्हा लिलाव सुरु होणार आहे. साप्ताहिक सुट्टी, दिवाळीची पाच दिवस सुट्टी आणि पुढील आठवड्यात शनिवार-रविवार ही साप्ताहिक सुट्टी असे एकूण नऊ दिवस लिलाव बंद राहतील.

ऑक्‍टोबर महिन्याच्या सुरुवातीला कांद्याच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र काही दिवसातच कांद्याच्या दरात घसरण होऊन कांदा सरासरी 1000 रुपयांवर पोहोचला. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीनंतर कांद्याच्या दरात वाढ होणार की घसरण होणार याकडे शेतकऱ्यांचें लक्ष लागले आहे.

पिंपरी बाजारपेठेत स्थानिक शेतकऱ्यांकडून कांदा आणला जातो. त्यामुळे लासलगाव बाजारपेठतील कांद्याचे लिलाव नऊ दिवस बंद असले, तरीदेखील त्याचा पिंपरी बाजारपेठेवर परिणाम जाणवणार नाही. याशिवाय दिवाळीतील कामकाजाचे नियोजन करण्यात आले आहे. दिवाळति एकह दिवस पिंपरी बाजारपेठ बमद राहणार नाही.
राजू शिंदे,
विभागप्रमुख, पिंपरी उपबाजार


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)