लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाला उत्कृष्ठ एन. एस. एस. विभाग पुरस्कार

सातारा ः उत्कृष्ठ एन. एस. एस. विभाग व उत्कृष्ठ प्रकल्प अधिकारी पुरस्कार प्राचार्य डॉ. आर. व्ही. शेजवळ यांच्या हस्ते स्वीकारताना प्रा. एन. व्ही. शिंदे, प्रा. पी. आर. जाधव, व एन. एस. सदस्य.

सातारा, दि. 4 (प्रतिनिधी)- शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचा 2017-18 चा उत्कृष्ठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा पुरस्कार श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे लाल बहादूर शास्त्री कॉलेज ऑफ आर्टस्‌, सायन्स अँड कॉमर्सला मिळाला. तसेच उत्कृष्ठ प्रकल्प अधिकारी म्हणून या विभागाचे प्रकल्प अधिकारी प्रा. एन. व्ही. शिंदे यांनाही विद्यापीठाचा उत्कृष्ठ प्रकल्प अधिकारी म्हणून पुरस्कार मिळाला आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. व्ही. शेजवळ यांनी त्यांचे अभिनंदन केले.
ज्येष्ठ मार्गदर्शकांनी आजपर्यंत केलेल्या मार्गदर्शनाचे फलित म्हणून महाविद्यालयास विद्यापीठाचा उत्कृष्ठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग पुरस्कार प्राप्त झाला. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाने वृक्षारोपण, पाणी अडवा, पाणी जिरवा, बेटी बचाव, ग्राम स्वच्छता अभियान, वित्तीय साक्षरता अभियान यासारखे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत. प्रा. एन. व्ही. शिंदे हे प्रकल्प अधिकारी म्हणून 2015-16 पासून या महाविद्यालयात कार्यरत आहेत. त्यांनी 2016-17 मध्ये वासोटा येथे राज्यस्तरीय शिबीराचे यशस्वी आयोजन केले होते. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेस प्राचार्य डॉ. आर. व्ही. शेजवळ यांचे मार्गदर्शन लाभले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)