लालू, राबडी, तेजस्वी यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल

आयआरसीटीसी प्रकरणी सीबीआयचे पाऊल
नवी दिल्ली – सीबीआयने आज राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव, त्यांच्या पत्नी राबडीदेवी आणि पुत्र तेजस्वी यांच्यासह 14 जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) दोन हॉटेलांच्या देखभालीचे कंत्राट एका खासगी कंपनीला देताना झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणावरून हे पाऊल उचलण्यात आले.
लालू रेल्वे मंत्री असताना आयआरसीटीसीच्या रांची आणि पुरीमधील दोन हॉटेलांच्या देखभालीचे कंत्राट विनय आणि विजय कोचर यांच्या मालकीच्या सुजाता हॉटेल्स या कंपनीला देण्यात आले.

बिहारची राजधानी पाटणामधील तीन एकर जागेच्या बदल्यात हे कंत्राट देण्यात आल्याचा आरोप आहे. कंत्राट मंजुरीबाबत कोचर यांच्यावर मेहेरनजर करताना लालूंनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप याप्रकरणी ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी सीबीआयने येथील न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्यामुळे लालू आणि त्यांच्या कुटूंबीयांच्या अडचणी वाढण्याची शक्‍यता आहे. याप्रकरणी सीबीआयने अलिकडेच बिहारच्या माजी मुख्यमंत्री असणाऱ्या राबडीदेवी यांची चौकशी केली. तर चारा घोटाळ्याशी संबंधित प्रकरणांत शिक्षा ठोठावण्यात आल्याने लालू सध्या तुरूंगात आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)