लालू प्रसाद यादव हे तळागाळातील लोकांशी जोडलेले नेते – शत्रुघ्न सिन्हा

नवी दिल्ली – भाजपचे ज्येष्ठ नेते  शत्रुघ्न सिन्हा हे काही दिवसांपासून भाजपवर  नाराज आहेत. त्यांच्याकडून पक्षावर सातत्याने टीका करण्यात येतीये. मात्र दुसरीकडे त्यांनी आज लालू प्रसाद यादव यांचं कौतुक केल्यानं तर्क -वितर्कांना उधाण आलंय.

चारा घोटाळ्यातील एका प्रकरणात सीबीआयच्या विशेष न्यायालयानं आज लालू यादव यांना १४ वर्षांची शिक्षा ठोठावली. हा निकाल आल्यानंतर काही तासांतच शत्रुघ्न सिन्हा यांनी ‘रीम्स’ रुग्णालयात धाव घेऊन लालूंची भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना ते म्हणाले की,लालू हे  जमिनीवर पाय असलेले, तळागाळातील लोकांशी जोडलेले नेते आहेत. जनतेचा आशीर्वाद त्यांच्या पाठिशी आहे,’ शिक्षा  सुनावल्यानंतरही त्यांचा आत्मविश्वास कायम असल्याचं आपल्याला जाणवलं असंही त्यांनी म्हंटलं आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)