लालू प्रसाद यादव सीबीआय कोर्टात शरण

रांची – राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि चारा गैरव्यवहार प्रकरणातील दोषी लालू प्रसाद यादव यांनी सीबीआयच्या दोन विशेष न्यायालयांपुढे आत्मसमर्पण केले. लालू प्रसाद यादव यांना उपचारासाठी मंजूर करण्यात आलेल्या जामिनाची मुदत समाप्त झाल्याने त्यांना न्यायालयात उपस्थित रहाणे क्रमप्राप्त होते. आत्मसमर्पण केल्यानंतर लालू प्रसाद यांना बिरसा मुंडा कारागृहामध्ये आणि नंतर वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले.

झारखंड उच्च न्यायालयाने बुधवारी लालू प्रसाद यांना सीबीआय न्यायालयापुढे आत्मसमर्पण करण्याची सूचना केली होती. त्यानंतर लालू प्रसाद रांचीवरून पाटणा येथे दाखल झाले होते. चारा गैरव्यवहार प्रकरणी गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये लालू यांना दोषी ठरवण्यात आल्यापासून त्यांना बिरसा मुंडा कारागृहातच ठेवण्यात आले होते. कारगृहाच्याच डॉक्‍टरांकडून लालू प्रसाद यांची तपासणी आणि उपचार करण्यात यावेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याशिवाय राजेंद्र इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या डॉक्‍टरांकडूनही लालू प्रसाद यांच्यावर उपचार व्हावेत, अशी सूचना न्यायालयाने केली आहे. चारा प्रकरणातील चारपैकी पहिल्या प्रकरणात लालू प्रसाद यांना 30 सप्टेंबर 2013 रोजी दोषी ठरवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)