लालू प्रसाद यादव यांच्या जामीन मुदतीत वाढ

रांची : बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना झारखंड उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. यावेळी त्यांच्या जामीनामध्ये सहा आठवडय़ांची वाढ करण्यात आली आहे.

आता जामिनाचा कालावधी 14 ऑगस्टपर्यंत निर्धारीत करण्यात आला आहे. लालूप्रसाद यादव यांच्या प्रकृतीचे कारण आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी लागणाऱया कालावधीची गरज लक्षात घेऊन न्यायालयाने त्यांच्या जामीन कालावधीत मोठा अवधी देण्याचा निर्णय घेतला आहे. न्यायमूर्ती अपरेश कुमार यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)