नवी दिल्ली : चारा घोटाळा प्रकरणात तुरुंगवासात असलेले राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण निवडणूक आयोगाने वर्ष २०१४-१५ चा वार्षिक लेखापरीक्षा अहवाल सादर न केल्याबद्दल लालूंच्या पक्षाला नोटीस पाठवली आहे. तुमच्या पक्षाची मान्यता का रद्द केली जाऊ नये ? असा प्रश्नदेखील आयोगाने नोटीशीसोबत विचारला आहे. २० दिवसांच्या आत या नोटीसला पक्षाकडून उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.

निवडणूक आयोगाने १३ एप्रिल रोजी लालूंच्या पक्षाला यासंबंधी नोटीस पाठवली आहे. पुढील महिन्याच्या सुरूवातीपर्यंत जर वार्षिक लेखापरीक्षा अहवाल सादर केला नाही तर पक्षाची मान्यता रद्द केली जाईल असे आयोगाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक पक्षाला वार्षिक लेखापरीक्षा अहवाल ३१ ऑक्टोबरपर्यंत सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, लालूंच्या पक्षाने वर्ष २०१४-१५ चा वार्षिक लेखापरीक्षा अहवाल अद्याप सादर केलेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)