लालू पुत्र तेजप्रताप यांचा बॉलीवूड प्रवेश

बिहारच्या राजकारणात दबदबा असलेल्या लालूप्रसाद यादव याच्या घराण्यातील त्यांचे सुपुत्र तेजप्रताप राजकारण करतानाच आता बॉलीवूड प्रवेशासाठी सज्ज झाले आहेत. आपल्या बॉलीवूड प्रवेशाची माहिती खुद्द तेजप्रताप यांनीच त्यांच्या ट्विटर अकौंटवरून दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तेजप्रताप बिहारचे माजी मंत्री आहेत. तेजप्रताप यांनी ट्विटरवरून एक पोस्टर पोस्ट केले आहे. “रुद्र द अवतार’ या नावाचा हा सिनेमा हिंदी आहे. यापूर्वी त्यांनी त्यांचे एक शिवस्वरूपातील एक पोस्टर रिलीज केले होते तेव्हा त्यावरून वादाचे मोहोळ उठले होते.

लालू प्रसाद यांच्या राष्ट्रीय जनता दलामध्ये तेजप्रताप नाखूष आहेत. अलिकडेच तेजप्रताप यादव यांनी ‘पक्षात माझे कोणीही ऐकत नाही’ अशी तक्रार केली आहे. काही समाजकंटक घटकांनी पक्षात प्रवेश केला असून ते भावाभावांमध्ये भांडण लावू पाहत आहेत, अशीही तक्रार त्यांनी केली आहे.

राजकारणी लोकांनी सिनेमात येण्याची हि पहिलीच वेळ नाही. रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग याने “मिले न मिले हम’ चित्रपटात 2011 साली हिरोची भूमिका केली होती मात्र हा चित्रपट साफ कोसळल्यावर चिराग पुन्हा राजकारणात सक्रिय झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)