लालूप्रसाद व कुटुंबियांना जामीन !

नवी दिल्ली: आयआरसीटीसी घोटाळा प्रकरणात माजी रेल्वेमंत्री व राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव, त्यांच्या पत्नी राबडी देवी आणि त्यांचे चिरंजीव तेजस्वी यांना दिल्लीच्या न्यायालयाने सोमवारी जामीन मंजुर केला. प्रत्येकी एक लाख रूपयांच्या जामीनावर तसेच प्रत्येकी एका जामीनदाराच्या हमीवर त्यांना हा दिलासा देण्यात आला आहे. या तिघांना न्यायालयाने या आधी अंतरीम जामीन दिला होता. त्याची मुदत आज संपली त्यानंतर त्यांचा हा जामीन कायम करण्यात आला आहे. त्यामुळे राबडी देवी आणि तेजस्वी यांची अटक टळली आहे. तथापि स्वता लालूप्रसाद मात्र अन्य गुन्ह्यात कारागृहात शिक्षा भोगत आहेत. आयआरसीटीसीचे हे प्रकरण मनि लॉंड्रिंगचे आहे आणि या संस्थेची दोन हॉटेल्स खासगी कंपन्यांना चालवण्यासाठी देताना त्यात भ्रष्टाचार केल्याचा लालू प्रसाद व त्यांच्या कुटुंबियांवर आरोप आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)