लालूप्रसाद यादव लालूंना 14 वर्षांची शिक्षा, 60 लाखांचा दंड!

रांची: बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांचा पाय आणखीच खोलात गेला आहे.  लालूंना चारा घोटाळ्यातील चौथ्या प्रकरणात 14 वर्षांची शिक्षा तर 30-30 लाख रुपयांचा दंड न्यायालयाने ठोठावला. जर लालू यादव यांनी दंड भरला नाही तर त्यांच्या शिक्षेत एका वर्षाची वाढ करण्यात येणार आहे.

लालू यादव यांना दोन कलमांतर्गत शिक्षा सुनावण्यात आली.. दोन्ही कलमांतर्गत लालू यादव यांना प्रत्येकी  ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आणि दोन्ही शिक्षा वेगवेगळ्या भोगायच्या आहेत. याशिवाय लालू यादवांवर भ्रष्टाचार विरोधी कायद्याअंतर्गतही कारवाई करण्यात आली. रांचीच्या स्पेशल सीबीआय कोर्टानं लालू यादव यांना दोषी घोषित केलं.

यापूर्वीच्या तीन खटल्यात सुनावलेल्या शिक्षा एकाचवेळी भोगायच्या आहेत. मात्र चौथ्या खटल्यातील शिक्षा वेगवेगळ्या भोगायच्या आहेत.  शिवाय दंडाची रक्कमही वेगवेगळी म्हणजेच 30-30 लाख अर्थात 60 लाख रुपये आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आज शिक्षेची सुनावणी करण्यात आली. मात्र लालू सध्या रांचीच्या रिम्स रुग्णालयात उपचार घेत असल्याने, ते या सुनावणीला हजर नव्हते. त्यांना लवकरच दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलवण्यात येणार आहे.

लालू यादव आतापर्यंत 6 पैकी 4 खटल्यात दोषी आढळले आहेत, तर दोन खटल्याचीं सुनावणी सुरु आहे. 19 मार्चला कोर्टाने 31 पैकी 19 आरोपींना दोषी धरलं होतं. ज्यात लालूंचाही समावेश होता.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)