लालूपुत्र तेजप्रताप यांचा घटस्फोटासाठी अर्ज 

पाटणा: राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे थोरले पुत्र तेजप्रताप यांनी शुक्रवारी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. त्यांचा सहा महिन्यांपूर्वीच बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा राय यांची नात ऐश्‍वर्या हिच्याशी विवाह झाला होता. मोठी चर्चा झालेल्या त्या भव्य विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री नितीशकुमार, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्यासह सर्वच राजकीय गोतावळा जमला होता. तेजप्रताप आणि ऐश्‍वर्या या दाम्पत्याचे एकमेकांशी पटत नसल्याचे वृत्त काही दिवसांपासून पसरले होते. त्यावर तेजप्रताप यांनी येथील दिवाणी न्यायालयात दाखल केलेल्या अर्जामुळे शिक्कामोर्तब झाले. मात्र, त्या घडामोडीबाबत अधिक माहिती प्रसारमाध्यमांना देण्याचे यादव आणि राय या दोन्ही कुटूंबांनी टाळले.

दाम्पत्य एकमेकांना अनुरूप नसल्याचे कारण देत घटस्फोटासाठी अर्ज करण्यात आला, एवढीच त्रोटक माहिती बिहारचे माजी मंत्री असणाऱ्या तेजप्रताप यांच्या वकिलाकडून देण्यात आली. बिहारमध्ये जेडीयू, राजद, कॉंग्रेस महाआघाडीचे सरकार असताना तेजप्रताप आणि तेजस्वी या दोन्ही लालूपुत्रांना मंत्री बनण्याची संधी मिळाली. लालूंचे राजकीय वारसदार म्हणून तेजप्रताप यांच्याऐवजी धाकटे पुत्र तेजस्वी यांचे महत्व वाढले आहे. त्यातून लालूंच्या कुटूंबात यादवीही निर्माण झाल्याच्या बातम्या अधूनमधून येत असतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)