लालूंच्या कुटूंबीयांची पाटण्यातील 44 कोटींची जमीन जप्त

नवी दिल्ली – राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या कुटूंबीयांची सुमारे 44 कोटी रूपये किमतीची जमीन आज जप्त करण्यात आली. मनी लॉण्डरिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ही कारवाई केली.

जप्त करण्यात आलेली जमीन बिहारची राजधानी पाटणा शहराच्या लगत आहे. त्यात सुमारे 3 एकर एवढ्या 11 प्लॉटस्‌चा समावेश आहे. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉण्डरिंग ऍक्‍टच्या (पीएमएलए) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. संबंधित मालमत्ता मनी लॉण्डरिंगशी संबंधित असल्याचा दावा ईडीने केला आहे. लालू आणि त्यांच्या कुटूंबीयांची भारतीय रेल्वेच्या अखत्यारीतील दोन हॉटेल्सच्या देखभालीचे कंत्राट देण्याच्या प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपावरून चौकशी सुरू आहे.

-Ads-

याप्रकरणी ईडी मनी लॉण्डरिंगशी संबंधित चौकशी करत आहे. लालू रेल्वेमंत्री असताना दोन हॉटेल्सच्या देखभालीचे कंत्राट एका कंपनीला देण्यात आले. त्या बदल्यात लालूंच्या कुटूंबीयांना लाचेच्या स्वरूपात पाटण्याजवळची जमीन देण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीबीआयने याआधीच गुन्हा दाखल केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)