लालूंच्या अंतरीम जामीनाला मुदतवाढ

रांची – चारा घोटाळा प्रकरणात कारावासाची शिक्षा झालेले बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना मंजुर झालेल्या अंतरीम जामीनाची मुदत 27 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. 24 ऑगस्ट रोजी त्यांच्या नियमीत जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

उच्च न्यायालयाने गेल्या 11 मे रोजी लालूंना वैद्यकीय कारणासाठी सहा आठवड्यांचा जामीन मंजुर केला होता त्यानंतर तो 14 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आला. लालूप्रसाद हे आत्ता पर्यंत चारा घोटाळ्याच्या चार प्रकरणांमध्ये दोषी ठरले असून त्यांना यात विविध कालावधींच्या कारावासाच्या शिक्षा सुनावण्यात आल्या आहेत. अजूनही त्यांच्या काही प्रकरणांची सुनावणी बाकी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)