लालुंना प्रत्येकी सात वर्षांच्या दोन शिक्षा

चारा घोटाळ्याचे चौथे प्रकरण
नवी दिल्ली – बिहार मधील चारा घोटाळा विषयात दाखल करण्यात आलेल्या एकूण पाच प्रकरणांपैकी चौथ्या प्रकरणातही राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांना एकूण चौदा वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली आहे. दुमका येथील कोषागारातून गैरमार्गाने 3 कोटी 13 लाख रूपये काढून भ्रष्टाचार केल्याचे हे प्रकरण आहे. या प्रकरणात सीबीआच्या विशेष न्यायालयाने त्यांना भारतीय दंडविधान आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यातील दोन कलमांनुसार प्रत्येकी सात वर्षाच्या दोन अशा एकूण चौदा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांना या आधीच्या तिन्ही प्रकरणात वेगवेगळ्या कालावधींच्या शिक्षा जाहीर झाल्या आहेत.

या शिक्षेला वरीष्ठ न्यायालयात आव्हान दिले जाणार आहे अशी माहिती लालूप्रसाद यादव यांचे वकिल प्रभातकुमार यांनी पत्रकारांना दिली. लालू सध्या रांचीच्याच कारागृहात आधीच्या खटल्यांची शिक्षा भोगत आहेत. त्यांनी आधीच्या शिक्षांनाही वरीष्ठ न्यायालयात आव्हान दिले आहे पण त्यांना त्या प्रकरणात जामीन मात्र मंजुर करण्यात आलेला नाही. बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा हेही या प्रकरणात आरोपी होते पण त्यांच्या सह अन्य 12 जणांची न्यायालयाने या प्रकरणातून निर्दोष सुटका केली आहे.

लालूप्रसाद यादव यांच्यावर सध्या रांचीच्या राजेंद्र इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आपल्या छातीत दुखत असल्याची तक्रार त्यांनी केल्यानंतर त्यांना गेल्या आठवड्यात तेथे उपचारासाठी नेण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)