लाला लजपतराय पतसंस्थेतर्फे गुणगौरव

मावळ- देहूरोड येथील लाला लजपतराय नागरी पतसंस्थेतर्फे दहावी व बारावीतील 27 गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. प्रथम क्रमांक 1000, द्वितीय 700 तर तृतीय क्रमांकासाठी 500 रुपये शिष्यवृत्ती देण्यात आली. तसेच, संस्थेतर्फे आर्थिकदृष्ट्या गरजू असणाऱ्या विद्यार्थ्यांना 2500 रुपये व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर ओ. पी. वैष्णव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संयोजक संदीप जाधव, पिंपरी-चिंचवड जिल्हा बौद्धिक प्रमुख जयंत जाधव, देहूरोड शहर भाजपचे अध्यक्ष कैलास पानसरे, अमर देवी पतसंस्थेचे सचिव उध्दव शेलार, ज्येष्ठ उद्योजक नरेश गुप्ता, विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे जिल्हाप्रमुख संदेश भेगडे, पतसंस्थेचे अध्यक्ष रघुवीर शेलार, उपाध्यक्ष अतुल शेलार, संचालक राजेश मुर्हे, दिलीप शेलार, निलेश भेगडे, अमित भेगडे, विलास शिंदे, राजेश मांढरे, शिवराज शेलार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन रमेश वेताळ, चेतना दाभाडे, योगेश शेलार व राजश्री मते यांनी संस्थेच्या सहकार्याने केले होते.
ब्रिगेडियर वैष्णव म्हणाले, विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी कष्टाची तयारी ठेवावी. विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात यश मिळवून देहूरोड शहराचे आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकीक मिळवून द्यावा. तसेच, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरित करण्याची गरज आहे.
संदीप जाधव म्हणाले, राष्ट्र हितासाठी हुशार विद्यार्थ्यांना मदत करून राष्ट्रप्रेमी युवा पिढी घडवण्याचे काम लाला लजपतराय पतसंस्थेचे केले आहे. तसेच, देशाला महासत्ता बनविण्यासाठी विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करुन शिक्षण घेण्याची गरज आहे.
प्रास्ताविक रघुवीर शेलार यांनी केले. लक्ष्मण शेलार यांनी सूत्रसंचालन केले. अतुल शेलार यांनी आभार केले

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)