लालपरी, पीएमपी बसला राखी बांधून रक्षाबंधन

पिंपरी – रक्षाबंधन निमित्ताने थेरगाव सोशल फाउंडेशनच्या वतीने लालपरी (एस.टी) बस व पीएमपी बसला राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले आहे. राज्यात सर्वात महत्त्वाची सार्वजनिक वाहतूक सेवा बजावणारी एस. टी. व पुणे आणि पिंपरी-चिंचवडला सार्वजनिक वाहतूक सेवा पुरवणारी पीएमपी या दोन बसला थेरगाव सोशल फाउंडेशनच्या वतीने डांगे चौंकात राखी बांधून त्यांच्या रक्षणाची जबाबदारी या फाउंडेशनच्या वतीने घेतली आहे. कुठलेही आंदोलन किंवा दंगल झाली की महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसची व पुणे-पिंपरी-चिंचवड शहरात पीएमपी च्या बसेसची तोडफोड करण्यात येत,  मात्र या थेरगाव सोशल फाउंडेशनच्या वतीने आता यापुढे तीच्या रक्षणाची जबाबदारी व शपथ घेऊन एक अनोखे रक्षाबंधन साजरे केल्याने शहरभर त्यांच्या रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे कौतूक होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
10 :thumbsup: Thumbs up
7 :heart: Love
0 :joy: Joy
3 :heart_eyes: Awesome
3 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)