लालटाकी येथे हाणामारी

नगर – शहरातील लालटाकी भागात हाणामारीची घटना घडली असून या घटनेची अधिक माहिती अशी दि.27 एप्रिल रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी रूईसा इकबाल शेख (रा.मिजगर कॉलनी लालटाकी ,लक्ष्मीमंदीराजवळ अ.नगर ) यांच्या घरासमोर मागील भांडणाच्या कारणावरून लालटाकी येथील लक्ष्मीमंदीराजवळ राहणारा शंकर नेटके (पुर्ण नाव माहित नाही ) याने दारू पिऊन फिर्यादी व फिर्यादीच्या वडीलांना मारहाण केली. तसेच भांडणे सोडविण्यासाठी आलेले नातेवाईक शौकत इनामदार यांना देखील शिवीगाळ करून मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी फिर्यादीने दाखल केलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)