लालचुटूक स्ट्रॉबेरीची पुणेकरांना भुरळ

भाव मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत स्थिर

पुणे – लाल-पिवळी, गोड-आंबट स्ट्रॉबेरी म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. अशा स्ट्रॉबेरीची मार्केट यार्डातील फळ बाजारात आवक होत आहे. नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील विविध भागांतून, गोव्यासह इतर राज्यातून स्ट्रॉबेरीला मोठी मागणी आहे.

स्ट्रॉबेरीचे भाव गेल्या वर्षीच्या तुलनेत स्थिर असून, मार्केट यार्डातील घाऊक बाजारात चांगल्या प्रतीच्या प्रति दोन किलोस दर्जेनुसार 150 ते 290 रुपये भाव मिळाला. तर, लूज मालाची 100 ते 200 रुपये भावाने विक्री झाल्याची माहिती व्यापारी युवराच काची यांनी दिली.

येथील बाजारात विशेषत: महाबळेश्‍वर परिसरातून स्ट्रॉबेरीची जास्त आवक होत आहे. याचबरोबर सातारा जिल्ह्यातील विविध भागातूनही मोठी आवक होत आहे. रविवारी येथील बाजारात तब्बल चार टन स्ट्रॉबेरी दाखल झाली. यामध्ये, विंटर, एस.ए., कॅमेर ओझा, नादीला, आर-2, आर-1 तसेच स्वीट चार्ली या जातीचा समावेश असून खाण्यासाठी स्वीट चार्ली स्ट्रॉबेरीला नागरिक सर्वाधिक पसंती देत असतात. बाजारात दर्जानुसार प्रतिकिलोस 150 ते 290 रुपये भाव मिळत आहे. गेल्या आठवड्यात हाच भाव 100 ते 250 रुपये होता.

अवघ्या काही दिवसांवर आलेल्या नाताळासाठी त्याला शहरासह गोवा, हैदराबाद, कलकत्ता, बंगळुरू, सुरत, बडोदा आणि राजस्थान भागातून मोठी मागणी होत असून नववर्षाच्या आरंभासाठीही मोठी मागणी असणार असल्याचे यावेळी युवराज काची यांनी सांगितले. ते म्हणाले, यंदा राज्यात स्ट्रॉबेरीची लागवड वाढली आहे. पोषक हवामानामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. परिणामी, बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. सध्या चांगल्या दर्जाची स्ट्रॉबेरी बाजारात दाखल होत असून, फळांची गोडी आणि आकारही वाढला आहे. स्ट्रॉबेरीला घरगुती ग्राहकांसह कॅन्डी, आईस्क्रीम कंपन्यांकडून मोठी मागणी आहे. पराराज्यातून विशेषत: गोव्यातून जास्त मागणी आहे. मार्च अखेरपर्यंत हा हंगाम सुरू राहील, असेही त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)