लायन्स पॉईट येथे पडून युवक ठार

अपघात : तीन दिवसांनी मिळाला मृतदेह

लोणावळा, (वार्ताहर) – लोणावळ्यातील “लायन्स पॉईट’ या ठिकाणाहून गुरुवारी (दि.27) बेपत्ता झालेल्या युवकाचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात शिवदुर्ग मित्रच्या टीमला यश आले आहे.

आदित्य मनिष कदम (वय 20, रा. पुणे) असे युवकाचे नाव आहे. गुरुवारी (दि.24) सायंकाळी आदित्य हा लायन्स पॉईट येथून बेपत्ता असल्याची माहिती लोणावळ्यातील शिवदुर्ग टिमला मिळाली. आज सकाळपासून “लायन्स पॉईट’ परिसरात शिवदुर्गने शोधकार्य सुरू केले. मंडळाचे सदस्य अनिकेत देशमुख व प्रवीण देशमुख हे दोघे दरीत उतरून मृतदेह शोधत असताना धुके व पावसामुळे शोधकार्यात बरेच अडथळे येत होते. दुपारी 1.30 सुमारास आदित्यचा मृतदेह दरीत सापडला.

अथक प्रयत्नानंतर सायंकाळी 4.30 वाजता त्याला रोपच्या सहाय्याने दरीतून बाहेर काढण्यात आले. या शोध पथकामध्ये शिवदुर्गचे अजय राऊत, राजेंद्र कडू, दिनेश पवार, महेश मसने, ब्रिजेश ठाकूर, अशोक उंबरे, राजू पाटील, रोहित वर्तक, गणेश गिध, अनिकेत देशमुख, प्रवीण देशमुख, अजय शेलार, सुनील गायकवाड सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)