लायन्स क्‍लबतर्फे मोफत कृत्रिम प्रत्यारोपण शिबीर

पिंपरी – द इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्‍लबज्‌ लायन्स प्रांत 3234 डी 2 आणि अहमदाबाद येथील गुजरात रिसर्च अँड मेडिकल इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमाने 4 ते 7 जानेवारी दरम्यान मोफत कृत्रिम पायरोपण (जयपूर फूट) शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

लायन्स क्‍लब या संघटनेच्या अंतर्गत पुणे, अहमदनगर, नाशिक यांचा समावेश असणाऱ्या लायन्स प्रांत 3234 डी 2 यांच्या वतीने हे शिबिर होणार आहे. दि. 4 व 5 जानेवारी रोजी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच) आणि 6 व 7 जानेवारी रोजी महावीर प्रतिष्ठान, महर्षिनगर, सलेसबरी पार्क पुणे येथे सकाळी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत गरजू व्यक्तींना कृत्रिम पाय त्यांच्या मापानुसार बनवून त्वरित तयार करून देणार आहेत.

कुबड्या, काठी, पोलियो क्‍लीपर्स, सर्जिकल बूट, निकॅपची आवश्‍यकता आहे. त्यांनाही त्यांच्या गरजेनुसार बूट, काठी व गरजू व्यक्तींना कंबरेचा पट्टाही देण्यात येणार आहे. प्रांतपाल ओमप्रकाश पेठे, पुखराज संचेती, गिरीश मालपाणी, दत्तात्रय गोरे, निमीचंद बोरा, योगेश कदम, किशोर गोडसे यांनी संयोजनात पुढाकार घेतला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)