लायन्स्‌ प्रिमियर लीग अजिंक्‍यपद’ टी-20 क्रिकेट स्पर्धा: नायर इगल्स्‌ संघाचा सलग दुसरा विजय 

पुणे: नायर इगल्स्‌ संघाने नाईक पलटण संघाचा 6 गडी राखून पराभव करत लायन्स्‌ क्‍लब डिस्ट्रीक 323 डी-2 तर्फे आयोजित “लायन्स्‌ प्रिमियर लीग अजिंक्‍यपद’ टी-20 क्रिकेट स्पर्धेत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. तर, कलाटे वॉरीयर्स संघाने ढोमसे टायगर्स संघाचा पराभव करून स्पर्धेतील पहिला विजय नोंदविला.

डेक्कन जिमखाना मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील सामन्यात नाईक पलटण संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी गमावून 139 धावा केल्या. पुष्कराज जोशी (67) व निलेश नातू (27) या दोघांनी दुसर्या गड्यासाठी 79 चेंडूत 79 धावा करून संघाला समाधानकारक धावसंख्या उभी करून दिली. नायर इगल्स्‌ संघाने हे आव्हान 16.5 षटकात व 4 गडी गमावून पूर्ण केले. अभिषेक मोहीते (51 धावा), नितेश गुंदेचा (24), फैयाझ लांडगे (24) व धीरज कदम (19) यांनी महत्वपूर्ण धावा करून संघाचा विजय साकार केला.

-Ads-

तर अन्य एका सामन्यात ढोमसे टायगर्स संघाने पहिल्यांदा फलंदाजी स्विकारली. कलाटे वॉरीयर्स संघाने अचुक गोलंदाजी करून ढोमसे टायगर्सचा डाव 19.1 षटकात व 118 धावांवर मर्यादित ठेवला. हे आव्हान कलाटे वॉरीयर्सने 17.3 षटकात व 3 गडी गमावून 119 धावा करत पूर्ण केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)