लायन्स्‌ प्रिमियर लीग अजिंक्‍यपद टी-20 क्रिकेट स्पर्धा: ढोमसे टायगर्स संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

पुणे: ढोमसे टायगर्स संघाने नाईक पलटण संघाचा 70 धावांनी एकतर्फी पराभव करून लायन्स्‌ क्‍लब डिस्ट्रीक 323 डी-2 तर्फे आयोजित “लायन्स्‌ प्रिमियर लीग अजिंक्‍यपद’ टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.

नेहरू स्टेडियम मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत ढोमसे टायगर्स संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 160 धावा करताना नाईक पलटन सम्घासमोर विजयासाठी 161 धावांचे आव्हान ठेवले. प्रत्युत्तरात फलंदाजीस उतरलेल्या नाईक पलटन संघाला 16.5 षट्‌कांत सर्वबाद 90 धावा करता आल्याने त्यांना 70 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.

-Ads-

यावेळी, 161 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या नाईक पलटनसंघाची सुरुवात खराब झाली. मात्र, त्यांच्या नागेश चव्हानने एक बाजू सांभाळत संघाचा डाव सावरला. यावेळी नागेशने 24 धावांची खेळी केली. तर, पुष्कराज जोशी आणि ओंकार बल्लाळयांनी प्रत्येकी 14 धावा करुन त्याला साथ दिली. मात्र त्यांना संघाचा पराभव टाळता आला नाही. यावेळी ढोमसे टायगर्सच्या शेखर दालमीयाने 23 धावांत 5 गडी बाद केले तर सुनिल कामनाथने केवळ 1 रन देऊन 2 गडी बाद करत नाईक पलटनच्या संघाला 90 धावांतच रोखले.

तत्पूर्वी, ढोमसे टायगर्ससंघाने प्रथम फलंदाजी करताना रोहन घाटगे आणि महेश दिवटेयांनी संघाचा डाव सावरताना चांगली फलंदाजी केली. यामध्ये रोहन घाटगेने 47 तर महेश दिवटे यांनी 37 धावा केल्या. तर, संतोष शहा 23, विजय कोतवाल 21 यांनी संघाला दिडशेचा टप्पा गाठून दिला. यावेळी नाईक पलटनसंघाच्या श्रेयस दिक्षीत 2 गडी बाद करत 26 धावा दिल्या. तर, पुष्कराज जोशीने 36 धावांमध्ये 2 गडी बाद केले.

उपान्त्य फेरीमध्ये शिवनेरी लायन्स्‌ आणि नाईक इगल्स्‌ यांच्यात पहिला सामना आणि ढोमसे टायगर्स आणि कलाटे वॉरीयर्स यांच्यामध्ये दुसरा सामना रंगणार आहे.

सम्क्षिप्त धावफलक
ढोमसे टायगर्स – 20 षटकांत 6 बाद 160 (रोहन घाटगे 47, महेश दिवटे 37, संतोष शहा 23, विजय कोतवाल 21, श्रेयस दिक्षीत 2-26, पुष्कराज जोशी 2-36) वि.वि. नाईक पलटणः 16.5 षटकांत सर्वबाद 90 (नागेश चव्हाण 24, पुष्कराज जोशी 14, ओंकार बल्लाळ 14, शेखर दालमिया 5-23, जयराज उगाळे 2-14, सुनिल कामथान 2-1); सामनावीरः शेखर दालमिया;


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)