लाभार्थ्यांना “पीएम किसान’ देण्यात अपयश

शरद बुट्टे पाटील : अधिकाऱ्यांनी काम न करता कागदपत्रांसाठी केली अडवणूक

राजगुरूनर- किसान सन्मान निधी योजनेसाठी खेड तालुक्‍यातील 70 हजारांपैकी 28 हजार शेतकऱ्यांनी अर्ज भरले होते ही संख्या अत्यंत कमी आहे. तालुक्‍यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात तालुक्‍यातील अधिकाऱ्यांनी काम केले नाही. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पात्र लाभार्थ्यांना आपण ही योजना देण्यात अपयशी झालो आहोत, अशी कबुली जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी दिली.
पंतप्रधान किसान (पीएम किसान) सन्मान निधी योजनेअंतर्गत 4 फेब्रुवारी 2019 पासून खेड तालुक्‍यात या योजनेसाठी अर्ज स्वीकारण्याचे काम सुरू झाले. अवघ्या पाच दिवसांच्या मुदतील तालुक्‍यात 27 हजार 776 शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज जमा केले. देशभरात एकाचवेळी शासन पातळीवर आज (रविवारी) या योजनेचा शुभारंभ पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत उत्तरप्रदेशात करण्यात आला. याबरोबरच देशातील सर्व तालुका पातळीवर या योजनेचा शुभारंभ झाला. याचा शुभारंभ खेड तालुक्‍याही करण्यात आला असून योजनेंतर्गत तालुक्‍यातील 10 लाभार्थींचा प्रतिनिधिक सन्मान आमदार सुरेश गोरे यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी शरद बुट्टे पाटील बोलत होते. यावेळी तहसीलदार सुचित्रा आमले, तालुका कृषी अधीक्षिका संगीता माने, नायब तहसीलदार राजेश कानसकर, जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, बाबाजी काळे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य दिलीप मेदगे,खेड पंचायत समिती उपसभापती भगवान पोखरकर, सदस्य अंकुश राक्षे, ज्योती अरगडे, नगर सेवक शंकर राक्षे, कृषी पर्यवेक्षक विजय पडवळ,प्रवीण शिंदे आदिसह शेतकरी उपस्थित होते.
शरद बुट्टे पाटील म्हणाले की, योजनेतील लाभार्थ्यांना सात बारा, घरपट्टी आदी कागदपत्रांसाठी अधिकाऱ्यांनी अडवणूक केली. महसूल, कृषी प्रशासनाने या योजनेकडे दुर्लक्ष केले आहे. चांगले बोलून कौतुक करणे गैर आहे. शेतकऱ्यांचा ऑनलाईन डाटा सरकारकडे पाठवण्यात आला नाही. या योजनेअंतर्गत अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची मागणी करणार असून आमदार सुरेश गोरे यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडावा असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण शिंदे तर सूत्रसंचालन व आभार ज्योती राक्षे यांनी केले.

  • हो यात तथ्य आहे -आमदार गोरे
    गेली 15 दिवस ही योजना सुरू होती. अधिकारी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाहीत लोकप्रतिनिधीना शासकीय अधिकाऱ्यांना समाविष्ट करून घेतले नाही. त्यामुळे अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत यात तथ्य आहे. तालुक्‍यात 1 लाख 28 लाख शेतकरी आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत अनेक लाभाच्या योजना समाविष्ट होण्याची शक्‍यता आहे. तालुक्‍यात सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी अर्ज दाखल करण्यासाठी मुदत वाढ मिळण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील, असे आमदार सुरेश गोरे यांनी नमूद केले.
  • खेड तालुक्‍यात 1 लाख 28 हजार शेतकरी आहेत. त्यापैकी लाभार्थी 70 हजार होते. त्यातून 27 हजार 776 शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यासाठी तालुक्‍यातील कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक यांचे मोठे सहकार्य लाभले. पोलीस पाटलांनी यात मोठे योगदान दिले.
    – सुत्रिचा आमले, तहसीलदार, खेड तालुका
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)