लाभार्थ्यांना टप्प्याने निधी, वस्तू वाटप करा

संजीवराजे : सातारा तालुका आढावा बैठकीत सूचना
सातारा,दि.2 प्रतिनिधी – समाजकल्याण विभागामार्फत दिव्यांगांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी आर्थिक मदत केली जाते. या माध्यमातून ढिगभर लोकांना पैसेवाटपाचा कार्यक्रम करु नका, त्यांना भविष्यात उद्योजक बनता येईल, अशी मदत करा. यासाठी तीन वर्षांचे नियोजन करा. या तीन वर्षांत लाभार्थ्यांना टप्प्याने निधी अथवा वस्तू वाटप करा, अशा सूचना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी केली.
सातारा पंचायत समितीत आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. उपमुख्यकार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, सभापती मिलिंद कदम, उपसभापती जितेंद्र सावंत, गटविकास अधिकारी अनिता गावडे, जिल्हा परिषदेचे सभापती मनोज पवार, वनिता गोरे, सदस्या कमल जाधव, अर्चना देशमुख यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
संजीवराजे म्हणाले, दिव्यांगांसाठी शासनाकडून मिळणाऱ्या निधीपैकी 5 टक्के निधी खर्च करायचा असतो. लाभार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा व्हावा, यामागे उद्देश आहे. मात्र, लाभार्थ्यांची संख्या वाढवून पाचशे-हजार रुपये त्यांच्या हातावर टेकवले तर त्यांना त्याचा फायदा होणार नाही. आटाचक्की, झेरॉक्‍स मशिन यासारख्या वस्तू त्यांना दिल्या गेल्यास त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता येईल. दिव्यांगांना विश्वासात घेऊन या निधीचे वाटप करणे गरजेचे आहे.
यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे म्हणाले, आर्थिक वर्षांत जी विकासकामे करण्यात येणार आहेत, त्यांचे आराखडे तयार करण्याचे काम पारदर्शकपणे करा. शाळा, अंगणवाड्या यांच्या भौतिक सुधारणांसाठी जास्तीत जास्त निधी वापरला जावा. अनेक शाळांमध्ये शौचालये आहेत, मात्र त्यांची दुरावस्था झालेली
आहे. ही कामे प्राधान्याने घ्यावीत. अनेकदा ई टेंडर प्रक्रिया टाळण्यासाठी एकाच कामाची फोड केली जाते. तीन लाखांच्या आत काम
बसविण्यासाठी कामाची फोड थांबवा. दरम्यान, सातारा तालुक्‍यामध्ये हजार अतिक्रमणे नियमित करण्यात येणार आहेत. प्रत्यक्षात हा तालुका मोठा असल्याने या अतिक्रमणांची संख्या मोठी आहे.ज्यांना स्वत:ची जागा नाही, घरही नाही, ते लोक शासकीय जागांवर अतिक्रमण करुन राहत आहेत, ती नियमित करुन त्यांच्याकडून ग्रामपंचायत कर वसूल करण्याची कार्यवाही करायची आहे. शासनाच्या जुलै 0 परिपत्रकानुसार ग्रामसेवकांनी कार्यवाही करावी, एकही लाभार्थी वंचित ठेवू नका, अशा सूचना
उपमुख्यकार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)