लाभाच्या योजनांसाठी ग्रामपंचायतीकडून पाठपुरावा आवश्‍यक

कोपरगाव – शासनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना होण्यासाठी स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनदेखील पाठपुरावा होण्याची गरज जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी व्यक्त केली.

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण व महिला-बालकल्याण विभागाच्या माध्यमातून संवत्सर येथे शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनींना सायकल, वह्या, पेन, कंपास आणि सायकलमध्ये हवा भरण्यासाठीच्या पंपाचे वाटप राजेश परजणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-Ads-

शालेय विद्यार्थ्यांना शासनाने विविध योजना लागू केलेल्या असतात. पण, योजनांची नेमकी माहिती मिळत नसल्याने अनेक लाभार्थी योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत. स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सर्व योजनांचा पाठपुरावा केला गेल्यास गावातील प्रत्येक माणसाला योजनांचा लाभ मिळवून देता येईल, असा विश्वास परजणे यांनी व्यक्त केला. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासाची कामे होत असतात, पण विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्राधान्य दिले जात असल्याचे परजणे म्हणाले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)