लाभाचे पदप्रकरणी आपच्या ‘त्या’ २७ आमदारांना निवडणूक आयोगाचा दिलासा 

संग्रहित छायाचित्र....

नवी दिल्ली – लाभाचे पद या प्रकरणी आम आदमी पक्षाला निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. आज निवडणूक आयोगाने आपच्या २७ आमदारांवरील आरोप रद्द केले आहेत. रोगी कल्याण समितीच्या अध्यक्षपद भूषवले या कारणावरून आपच्या २७ आमदारांवर सदस्यत्व रद्द होण्याची टांगती तलवार होती.

विभोर आनंद नामक विद्यार्थ्याने आपच्या २७ आमदारांविरोधात याचिका दाखल केली होती. या याचिकेत दिल्लीच्या वेगवेगळया रुग्णलायात रोगी कल्याण समितीचे अध्यक्षपद या २७ आमदारांकडे होते. नियमानुसार आमदार फक्त या समितीचा सदस्य बनू शकतो. त्यावरुन हे पद लाभाच्या पदामध्ये मोडत असल्याचा आरोप विभोर आनंदने केला होता. यावरून आपच्या आमदारांना अपात्र ठरवण्याच्या शिफारसी निवडणूक आयोगाने राष्ट्रपतींकडे पाठवल्या होत्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)