लादेनला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला मदत का करायची? ट्रम्प यांची स्पष्टोक्ती

वॉशिंग्टन (अमेरिका): पाकिस्तान आमच्यासाठी काही काम करत नाही. उलट त्याने अल कायदाचा म्होरक्‍या ओसामा बिन लादेनला आश्रय दिला होता. तो ही चोरून. तेव्हा पाकिस्तानला आम्ही मदत का करायची? असे म्हणत अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला देण्यात येणारी मदत रोखण्याचे समर्थन केले आहे. पाकिस्तानला आम्ही वर्षाला 1.3 अब्ज डॉलर्सची मदत करत होतो, असे त्यांनी सांगितले आहे.

दहशतवाद्यांविरुद्ध काहीही कारवाई न करता उलट दहशतवाद्यांना मदत करत असल्याच्या कारणावरून ट्रम्प प्रशासनाने सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानला देण्यात येणारी 300 कोटी डॉलर्सची मदत रोखली होती. तत्पूर्वी ऑगस्ट महिन्यात डोनॉल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तान दह्शतवाद्यांचे आश्रयस्थान असल्याचे सांगून दहशतवादाला मदत केल्यामुळे पाकिस्तानला बरेच काही गमवावे लागेल असा इशाराही पाकिस्तानला दिला होता. पण लष्करी अकादमीच्या अगदी शेजारी ओसामा बिन लादेनच लपून राहत होता. ही गोष्ट पाकिस्तानमधील सर्वांना माहीत होती. असे असूनही आम्ही पाकिस्तानला वर्षाला 1.3 अब्ज डॉलर्स देत होतो. यापुढे आम्ही ते देणार नाही. पाकिस्तान आमच्यासाठी काहीच करत नसल्याने मी त्यांना देण्यात येणारी मदत बंद केली. असे डोनॉल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)