लातूर महापालिका कॉंग्रेसने गमावली

भाजपची 38 जागा मिळवत पालिकेवर एकहाती सत्ता

लातूर : संपूर्ण राज्याचं आणि देशभरातील कॉंग्रेसचं लक्ष लागलेल्या लातूर महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे. कॉंग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या लातूरमध्ये भाजपने मोठी झेप घेतली आहे. गेल्या निवडणुकीत म्हणजेच 2012 साली लातूर महापालिकेत भाजपकडे एकही जागा नव्हती. मात्र, यंदा भाजपने थेट झिरोवरुन हिरो होत, सत्ता काबिज केली. त्यामुळे देशमुखांच्या लातुरमध्ये इथल्या जनतेने सपशेलपणे अमित देशमुखांना नाकारल्याचे दिसत आहे. लातूर महापालिकेच्या 70 जागांपैकी तब्बल 38 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. त्यामुळे हुकूमाची गढी म्हणून ओळखली जाणारी लातूर महापालिका कॉंग्रेसने गमावली आहे.
महानगरपालिकेच्या 70 जागांपैकी तब्बल 38 जागांवर विजय मिळवून भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. तर सत्ताधारी कॉंग्रेसला 31 जागीच यश मिळवता आलं. राष्ट्रवादी कॉंग्रेस केवळ एका जागेवर आटोपली. कॉंग्रेसचा गढ म्हणून विलासराव देशमुखांच्या लातूरकडे पाहिले जात होते. विलासरावांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र आमदार अमित देशमुख यांच्याकडे लातूर कॉंग्रेसची सूत्रे आली. त्यांच्याच नेतृत्त्वात यंदा लातूर मनपाची निवडणूक लढण्यात आली. मात्र कॉंग्रेसला आपला गढ आणि देशमुखांची गढी राखता आली नाही. तर दुसरहीकडे लातुर महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या खांद्यावर धुरा सोपवण्यात आली होती. जिल्हा परिषदेप्रमाणेच संभाजी पाटील यांनी लातूर मनपासाठीही काटेकोर नियोजन करुन ऐतिहासिक विजय मिळवला. त्यामुळे आता पुढच्या पाच वर्षांसाठी भाजपचा झेंडा हा लातुरच्या महापालिकेवर फडकताना दिसणार आहे.
लातूर महानगरपालिका निकाल – 2012
* कॉंग्रेस – 49
* राष्ट्रवादी – 13
* शिवसेना – 6
* अन्य – 2
लातूर महानगरपालिका निकाल – 2017
* भाजप – 38
* कॉंग्रेस – 31
* राष्ट्रवादी – 01

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)