लातूर: आषाढी एकादशीला पंढरपूरला जाणाऱ्या भक्तांसाठी 130 जादा बसेस

लातूर – राज्यात मोठ्या भक्ती भावाने आषाढी एकादशीला पंढरपूरला विठूरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भक्त पंढरपूरला दरवर्षी जातात असतात. एसटी बसचा अवलंब करत पंढरपूरला जाणाऱ्या भक्तांसाठी लातूर आगाराकडून आषाढी एकादशी निमित्त 30 जून ते 10 जुलै दरम्यान पंढरपूरसाठी 130 ज्यादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

एकट्या लातूर जिल्ह्यातून पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी जाणाऱ्यांची संख्या 15 लाखांच्या घरात आहे. पैकी जवळपास 7 लाख प्रवासी एसटीने पंढरपूरला जाणे पसंत करतात. ज्यादा सुरू करण्यात आलेल्या बसेसमध्ये जिल्ह्यातील उदगीर-25, लातूर-37, अहमदपूर-28, निलंगा-20, औसा-20, अशा 5 आगारांतून बसेसची पंढरपूरसाठी सोय करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)