लातूरमध्ये आयकर विभागाची आठ पथके तळ ठोकून 

शहरातील तीन कार्यालयासह रुग्णालयात झाडाझडती सुरु 

लातूर: लातूर शहरात आयकर विभागाने काल तीन रुग्णालये आणि औसा येथील खडी केंद्रासह लातूर शहरातील दोन कार्यालयावर छापे टाकले होते. एकाच दिवशी सहा वेगवेगळ्या रुग्णालयावर आणि कार्यालयांवर आयकर विभागाच्या छाप्यांदरम्यान काल दिवसभर कागदपत्रांची झाडाझडती होती. परंतू काल रात्री उशीरापर्यंत तपासणी सुरु असल्याने नेमके काय घबाड सापडले, हे मात्र समजू शकले नाही.

लातूर शहरात काल दुपारी 12 च्या दरम्यान शहरातील श्वास बालरुग्णालय, गोजमगुंडे बालरुग्णालय तर अल्फा या अतिदक्षता रुग्णालयावर एकाच वेळी बीड, जालना, औरंगाबाद या ठिकाणच्या अधिकार्यांनी छापे टाकून कागदपत्रे तपासण्याची मोहिम सुरू केली आहे.वार्षिक उलाढालीवर भरण्यात आलेला आयकर व ऑनलाईनद्वारे तपासणीदरम्यान समोर आलेली रक्कम यामध्ये तफावत असल्याने ही कारवाई सुरू असल्याचे संबंधित अधिकार्यांनी सांगितले आहे. कारवाई दरम्यान कमालीची गुप्तता पाळण्यात आली असून सबंधित रुग्णालये व खडी केंद्रावर दुसर्या दिवशी अधिकारी ठाण मांडून आहेत.

गेल्या 4 वर्षापासूनची झालेली उलाढाल आणि प्रत्यक्षात रुग्णालयांकडे असलेल्या कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तामध्ये ही कारवाई सुरू आहे. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत तपासणी करून पुन्हा बुधवारी सकाळी 11 वाजल्यापासून अधिकारी झाडाझडती घेत आहेत. श्वास बलरुग्णालय हे वर्धमान उदगीरकर यांचे तर गोजमगुंडे बालरुग्णालय हे डॉ. दत्ता प्रभाकर गोजमगुंडे यांचे व अल्फा सुपरस्पेशालिटी हे डॉ. दिनेश वर्मा यांचे रुग्णालय आहे. औसा येथील खडी केंद्र हे कारंजे यांच्या मालकीचे आहे. कागदपत्रांची तपासणी पूर्ण होईपर्यंत अधिकारी लातूरमध्येच रहणार असल्याचे सबंधित विभागाकडून सांगण्यात आले आहे. विभागीय सहआयुक्त विक्रांत पाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू आहे. यामध्ये अनेक गोष्टी समोर येणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)