लातूरमधील तीन अट्‌टल गुन्हेगार गजाआड 

दोन गावठी पिस्टल 5 काडतूसासह जप्त

लातूर – गंभीर गुन्ह्यातील तीन अट्‌टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. जिल्ह्यात ऑल आऊट ऑपरेशन व नाकाबंदी करुन गुरुवारी ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपींकडून 2 गावठी बनावटीचे पिस्टल, 5 जिवंत काडतूस जप्त केली आहेत.

पंकज शाम पारीख, मंगेश दिलीप सोनकांबळे (दोघे रा. लातूर) व प्रतिक दगडू केदार (रा. चाकूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. प्रतिक केदार याने मध्यप्रदेश येथून 15 दिवसांपूर्वी बेकायदेशीररित्या 2 देशी पिस्टल व 11 जिवंत काडतूस विकत घेतले होते. यापैकी पंकज पारीख याने 1 पिस्टल व 5 काडतूस खरेदी केले होते. पंकजचा मित्र मंगेश सोनकांबळे याला 1 पिस्टल व 3 काडतुसांची त्याने विक्री केली होती. असा खरेदी-विक्रीचा बाजार सुरू असतानाच यासंदर्भात स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना गुप्त बातमीदारामार्फत ही माहिती मिळाली.

-Ads-

त्यानुसार पोलीस निरीक्षक सुनिल नागरगोजे यांनी पथकाची नेमणूक करुन बंदोबस्त तैनात केला. पंकज पारिख याच्या आदर्श नगरातील घरावर स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून 1 पिस्टल व 2 काडतूस ताब्यात घेतले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)