लातूरमध्ये महिला रुग्णासोबत डॉक्‍टराचे अश्‍लिल चाळे 

लातूर – “रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा’ म्हणून गल्ली बोळात मोठमोठी रुग्णालये डॉक्‍टरांनी थाटले आहेत. त्यात त्याचा व्यवसायही चांगला चालतो. पण काही डॉक्‍टर रुग्ण सेवेच्या नावाखाली स्वतःच्या रुग्णालयात अवैध व्यवसाय करत असल्याचे दिसत आहे. असाच प्रकार लातुरात उघड झाला आहे. तपासणीसाठी आलेल्या महिला रुग्णासोबत एका डॉक्‍टरने अश्‍लिल वर्तन केल्याची खळबळजनक घटना घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात डॉ. आनंद पवार याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पिडीत विवाहित महिला पतीपासून विभक्त राहात आहे. धुणी-भांडी करुन आपली उपजिवीका ती भागवते. जुन-जुलै महिन्यात मासिक पाळीचा व अधिक रक्तस्त्राव होण्याचा आजार झाल्याने ती डॉ. आनंद पवार यांच्या रुग्णालयात उपचारासाठी गेलेली होती. त्यावेळी दोन वेळा बॉडी मसाज करण्याचा सल्ला त्यांनी दिला होता.

-Ads-

त्यानंतर 20 नोंव्हेबर 2018 रोजी सायंकाळी वाजण्याच्या सुमारास दवाखान्यात गेल्यानंतर बॉडी चेकअपच्या नावाखाली डॉक्‍टरने तिच्याशी अश्‍लिल वर्तन केले. आरडाओरडा करत ती दवाखान्याच्या बाहेर पळत आली आणि थेट पोलीस ठाणे गाठले व डॉक्‍टरच्या कृत्याबद्दल तक्रार दाखल केली. त्यानंतर डॉ. आनंद पवार याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
5 :thumbsup: Thumbs up
2 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
2 :blush: Great
7 :cry: Sad
108 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)