लातुरात 19 वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या 

लातूर – महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या 19 वर्षीय विद्यार्थ्यांने आज दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अद्याप आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून या घटनेची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात घेण्यात आली आहे.

प्रदीप राठोड (वय 19 वर्ष) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील रहिवासी आहे. मात्र, शिक्षणानिमित्त तो लातूर येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. तो शहरातील एमआयटी महाविद्यालयात बी.एसस्सी.च्या प्रथम वर्षाला होता. गुरुवारी दुपारी त्याचा मित्र खोलीमध्ये नसताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)