लाच स्विकारताना स. पोलीस निरीक्षकासह एकाला रंगेहाथ पकडले

पुणे,दि.29- सासवड येथील न्यायालयात दाखल असलेल्या खटल्यात जामीन मंजूर होण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्विकारताना सासवड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षकासह एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. या दोघांविरुध्द सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहायक पोलीस निरीक्षक मुकुंद काशीनाथ पालवे(42) व श्रीकांत बाळासाहेब ताम्हाण(29, रा.इखतपुरा, इंदापुर) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
यातील तक्रारदाराविरुध्द सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याला या गुन्हयात सासवड येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सासवड न्यायालयात जामीन मंजुर होण्यासाठी मदत करण्यासाठी पालवे यांनी दिड लाखाची लाच मागितली होती. याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे करणण्यात दाखल झाली होती. त्याप्रमाणे तक्रारीची गुरुवारी शहानिशा करण्यात आली. यानंरत सापळा रचण्यात आला. दरम्यान तडजोडी अंती एक लाख रुपयांची लाचेची मागणी करण्यात आली. सापळ्यामध्ये पालवे यांच्यावतीने श्रीकांत ताम्हाण याला एक लाख रुपयांची लाच स्विकाताना इंदापुर तालूक्‍यातील मौजे इखतपुर येथे पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस अधिक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 020-26122134/26132802/26050423/व्हॉटसअप क्रमांक 7875333333/9930997700 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)