लाचेच्या दोन वेगळ्या प्रकरणात तलाठ्यांची जामीनावर सुटका

पुणे – लाचेच्या दोन वेगळ्या प्रकरणात दोन तलाठ्यांची 25 हजार रुपयांच्या जामीनावर सुटका करण्यात आली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. डी. वडणे यांनी हा आदेश दिला आहे.
एका प्रकरणात संजय राजाराम कांबळे (वय 54, रा. आंबेगाव) याची जामीनावर सुटका करण्यात आली. कांबळे हा मावळ तालुक्‍यातील सजा वडेश्वर येथील तलाठी आहेत. खरेदी केलेल्या जमिनीची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी दोन हजार रुपये लाच मागितल्याप्रकरणी त्याल अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात तक्रारदाराने सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी कांबळेकडे अर्ज केला होता. त्या वेळी कांबळे याने पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत एसीबीकडे तक्रार आली. त्यानुसार या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. तडजोडीअंती तलाठ्याने दोन हजार रुपयांची लाच मागितल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले. त्यानुसार वडगाव मावळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम सात नुसार गुन्हा दाखल करून तलाठ्याला अटक होती. ऍड. सुधीर शहा, ऍड. सुहास कोल्हे यांनी त्यांच्यातर्फे काम पाहिले.
दुसऱ्या प्रकरणात गेनभाऊ जयवंत शेवाळे या तलाठ्याची जामीनावर सुटका करण्यात आली. खरेदी केलेल्या जमीनीच्या सातबारा उताऱ्यावरील चुकीची नोंद दुरुस्त करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना शेवाळेला अटक करण्यात आली होती. त्याच्यावर लोणीकाळभोर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साक्षी पुराव्यात हस्तक्षेप करु नये, दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत प्रत्येक सोमवारी सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत हजेरी लावावी, या अटीवर त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)