लाचप्रकरणी शिरोळ पंचायत समितीच्या दोन अधिकाऱ्यांना अटक

कोल्हापूर – शिरोळ पंचायत समितीकडील ग्रामीण पाणीपुरवठा विभाग क्रमांक आठचे शाखा अभियंता तुकाराम शंकर मंगल (वय 54, रा. संभाजीनगर, कोल्हापूर) व हातकणंगले पंचायत समितीचे तत्कालीन उपअभियंता अशोक महादेव कांबळे (वय 50, सध्या रा. पुणे) या दोघांवर शाहूपुरी पोलिसांत लाच मागितल्याचा गुन्हा दाखल झाला.

पाणी योजनेच्या पूर्ण केलेल्या कामाचे मूल्यांकन करून बिल करून देण्यासाठी दोन लाख व बिलावर सही करण्यासाठी दीड लाख रुपये लाचेची मागणी झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संशयित तुकाराम मंगल यांना अटक केली. तर कांबळे याला पुण्यातून अटक केली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कांबळे याच्याकडे त्यावेळी शिरोळ पंचायत समितीतील कामाचा अतिरिक्त कार्यभार होता. सध्या तो पुणे येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, उपविभाग क्रमांक चार येथे याच पदावर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)