लाचप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यास सक्‍तमजुरी

सातारा, दि.19 (प्रतिनिधी) – दाखल निनावी तक्रारीचा तपास आरोपीच्या बाजूने करुन त्याची बदनामी न करता प्रकरण मिटवून देतो तसेच मोबाईल व सिमकार्ड परत देण्यासाठी तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्याचा पोलीस हवालदार शंकर दत्तात्रय तिताडे याला 2011 मध्ये लाचलुचपत विभागाने
अटक केली होती. त्याचा निकाल देत न्यायालयाने त्यास 1 वर्ष सक्‍तमजुरी व दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास पंधरा दिवस सक्‍तमजुरीची शिक्षा सुनावली.

याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेली माहिती अशी की, शंकर दत्तात्रय तिताडे हा सातारा शहर पोलीस ठाण्यात नेमणुकीस असताना तक्रार यांचे विरोधात एक निनावी अर्ज आला होता. त्याचा तपास तिताडे याच्याकडे होता. तपासात सहकार्य करुन प्रकरण मिटवून देत तक्रारदाराचा घेतलेला मोबाईल व सिमकार्ड परत देण्यासाठी तिताडे याने तक्रारदाराला लाचेची मागणी केली होती. त्यानुसार तक्रारदार यांनी 8 एप्रिल 2011 रोजी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. मिळालेल्या तक्रारीनुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचून लाचेची मागणी करताना तिताडे यास रंगेहाथ पकडले होते. सदर गुन्ह्याचा तपास लाचलुचपत विभागाचे पो.नि. ओंबासे यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सातारा येथील विशेष न्यायालयात या खटल्याची सुनावणी होऊन शंकर तिताडे यास 1 वर्ष सक्‍तमजुरी व दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास पंधरा दिवस सक्‍तमजुरीची शिक्षा सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)