लाचप्रकरणी पोलिसावर गुन्हा दाखल

सातारा, दि. 29 (प्रतिनिधी)
तक्रारदाराच्या पत्नी, सासू व मेव्हण्याविरूध्द वाठार पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा समरी अहवाल पाठवण्यासाठी व गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी 10 हजाराची लाच मागणाऱ्या पोलिस नाईक राजकुमार कुंडलिक जगताप याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.तक्रारदार यांची पत्नी, सासू व मेहुणे यांच्या विरोधात वाठार पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा समरी अहवाल पाठवणे व गुन्ह्यामध्ये मदत करण्याची विनंती तक्रारदार यांनी पोना राजकुमार जगताप याच्याकडे केली होती. त्यासाठी जगताप याने तक्रारदारांकडे 10 हजार रूपयांची लाच मागितली होती. याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. दाखल तक्रारीची पडताळणी करत लाचलुचपत विभागाने जगताप याच्यावर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, कामात हलगर्जीपणा केल्याच्या कारणावरून जगताप याला जिल्हा पोलिस प्रमुखांनी यापुर्वीच निलंबीत केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)